उदगीर येथे उद्यापासून ‘अमृत योजना’ EDP प्रशिक्षणाचा शुभारंभ उद्योजकतेची नवी संधी जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण; व्यवसाय नियोजन, कौशल्य व शासकीय योजनांची मिळणार माहिती

प्टेंबर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP – Entrepreneurship Development Programme) प्रशिक्षणाचा शुभारंभ उदगीर येथे गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

उदगीर येथे उद्यापासून ‘अमृत योजना’ EDP प्रशिक्षणाचा शुभारंभ  उद्योजकतेची नवी संधी जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण; व्यवसाय नियोजन, कौशल्य व शासकीय योजनांची मिळणार माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

उदगीर, दि. २३ सप्टेंबर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP – Entrepreneurship Development Programme) प्रशिक्षणाचा शुभारंभ उदगीर येथे गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

हे प्रशिक्षण युवासिटी कॉम्प्युटर्स, कोटलावार कॉम्प्लेक्स, न्यू मोंडा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक युवक-युवती तसेच उद्योजकांसाठी हे प्रशिक्षण मार्गदर्शक ठरणार आहे.

प्रशिक्षणामध्ये उद्योजकतेची मानसिकता व आत्मविश्वास निर्माण करणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य विकसित करणे, योग्य व्यवसायाची निवड व व्यवसायाच्या संधी ओळखणे, व्यवसाय आराखडा (Business Plan) तयार करणे, आर्थिक नियोजन, भांडवल, कर्ज व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

यासोबतच बाजारपेठ, ग्राहक, विक्री व विपणन याबाबत मार्गदर्शन तसेच उपलब्ध शासकीय व वित्तीय संस्थांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा उद्देश युवकांना स्वयंरोजगार व रोजगार निर्मितीकडे प्रोत्साहित करून उद्योजकतेच्या दिशेने सक्षम करणे हा आहे.

उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे जाण्यास इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे. स्थळ : युवासिटी कॉम्प्युटर्स, कोटलावार कॉम्प्लेक्स, न्यू मोंडा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर दिनांक : २४ सप्टेंबर २०२६ वेळ : सकाळी १० वाजता संपर्क : ९९२३८७८८०३

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 06:56 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 06:56 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement