छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयात माहेश्वरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी माहेश्वरी समाज टीमचे स्वागत केले. आरतीनंतर झालेल्या बैठकीत अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी माहेश्वरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
यावेळी एडवोकेट राधेश्याम शिवप्रसाद इंदानी, माहेश्वरी सभा छत्रपती संभाजीनगर जिल्हा मंत्री, गणेश महादेव हेडा माहेश्वरी सभा सहसचिव, रामेश्वर जगन्नाथजी करवा माहेश्वरी सभा संघटन मंत्री, पुरुषोत्तमदास धूत तसेच माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी व टीम उपस्थित होती.
यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी माहेश्वरी समाजाच्या टीमचे स्वागत केले. गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment