लातूर येथे साक्षी जोशींच्या यशाला अमृतची शाबासकी; चिंतेश जोशी यांनी दिल्या शुभेच्छा

औसा तालुक्यातील बोरफळ येथील रहिवासी साक्षी जोशी यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा लातूर येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी साक्षी जोशी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

लातूर येथे साक्षी जोशींच्या यशाला अमृतची शाबासकी; चिंतेश जोशी यांनी दिल्या शुभेच्छा मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर, दि. २३ सप्टेंबर : औसा तालुक्यातील बोरफळ येथील रहिवासी साक्षी जोशी यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा लातूर येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी साक्षी जोशी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातून येऊन साक्षी जोशी यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर राज्यसेवा मुख्य परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे बोरफळ तसेच औसा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी साक्षी जोशी यांचे यश निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

यावेळी चिंतेश जोशी यांनी साक्षी जोशी यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील परीक्षेसाठी आणि प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य कायम ठेवून पुढील टप्प्यातही यश संपादन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

साक्षी जोशी यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अमृत परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 06:47 PM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 06:47 PM News publication time | Views: 41 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement