विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळख; लाखनीत ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने तहसील कार्यालय, लाखनी यांच्या सहकार्याने २३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २६ विद्यार्थी व ४ शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांची कार्यपद्धती, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रांसाठी आवश्यक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार धर्मेंद्र उरकुडकर तसेच मंडळ अधिकारी रिकेशकुमार देशमुख आणि अतुल वऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विभागाशी संबंधित कामकाजाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळख; लाखनीत ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न. मुख्य फोटो
विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळख; लाखनीत ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न. अतिरिक्त फोटो

लाखनी, दि. २३ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने तहसील कार्यालय, लाखनी यांच्या सहकार्याने तहसील कार्यालय, लाखनी येथे ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २६ विद्यार्थी व ४ शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, विविध विभागांचे कामकाज तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या शासकीय दाखले व प्रमाणपत्रांची प्रक्रिया प्रत्यक्ष समजावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान मा. नायब तहसीलदार श्री. धर्मेंद्र उरकुडकर यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांची ओळख करून दिली. कार्यालयातील विविध विभाग कोणती कामे करतात, त्यांची जबाबदारी काय आहे आणि नागरिकांशी संबंधित कामकाज कोणत्या पद्धतीने केले जाते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थी दशेत उपयुक्त ठरणाऱ्या विविध दाखल्यांची कार्यपद्धती तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची माहितीही त्यांनी समजावून सांगितली.

यानंतर विद्यार्थ्यांनी कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, विविध दाखले व प्रमाणपत्रांसाठी असलेली प्रक्रिया आणि संबंधित विभागांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी शासकीय कार्यालयाशी संबंधित विविध प्रश्न विचारले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना माहिती देत त्यांना संबंधित कामकाज समजावून सांगितले.

मा. मंडळ अधिकारी, लाखनी श्री. रिकेशकुमार देशमुख आणि मा. मंडळ अधिकारी, पिंपळगाव श्री. अतुल वऱ्हाडे यांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागाशी संबंधित कामकाजाची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयातील कामकाज समजून घेण्यासोबतच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबी जाणून घेण्याची संधी मिळाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयातील कामकाज प्रत्यक्ष पाहता आले. विविध विभागांचे कामकाज, त्यांच्यातील समन्वय आणि नागरिकांपर्यंत शासकीय सेवा कशा पद्धतीने पोहोचतात, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्यक्ष कार्यालयीन वातावरणात अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांना शासन व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी अधिक माहिती मिळाली.

या उपक्रमासाठी तहसील कार्यालय, लाखनी येथील मा. तहसीलदार तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा व्यवस्थापक श्री. ओंकार हरदास यांनी त्यांचे आभार मानले. तसेच लेट निर्धन पाटील वाघाये कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गणेश कापसे, प्राध्यापक श्री. तुषार डोंगरवार सर आणि इतर संबंधित शिक्षकांचेही आभार मानण्यात आले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा.

तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय, तळ मजला, श्री साई किराना घर, स्टेशन रोड, शास्त्री चौक, भंडारा येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : ९११२२२८७७५, ८८५७९३४७३२

Publisher: Sakshi Joshi News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: Sakshi Joshi News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement