नाशिक येथे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेला उत्स्पुर्त प्रतिसाद !

,दि.२६ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक अमृत कार्यालयात अमृत सक्षम उपक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.

नाशिक येथे घनकचरा व्यवस्थापन  कार्यशाळेला उत्स्पुर्त प्रतिसाद ! मुख्य फोटो
मुख्य फोटो

नाशिक: अमृत सक्षम उपक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन बुधवार, दि.२६ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक अमृत कार्यालयात करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनातून रोजगार / उद्योजक तयार व्हावेत या अनुषंगाने अमृत - सक्षम हा प्रकल्प करतोय. घनकचरा व्यवस्थापनातून निर्माण होणारे व्यवसाय जसे - पॅलेट निर्मिती, निर्माल्य पासून अगरबत्ती निर्मिती, कोकोपीट, RRR सेंटर इत्यादी व्यवसाय सुरू कारण्या संबंधी माहिती श्री. गोगटे सर यांनी दिली.


यावेळी नाशिक विभागीय व्यवस्थापक श्री. मंगेश खाडीलकर यांनी घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन केले तसेच अमृत योजना, अमृत सक्षम उपक्रम यांची माहिती सर्वांना दिली. या कार्यशाळेत एकूण १६ जणानी हजेरी लावली. सक्षम कार्यशाळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 06:27 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 06:27 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement