लातूर येथील रामदेव बाबा मंदिरातून अमृतच्या योजनांचा जनजागृती संदेश *पुजारी हरिराम शर्मा यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्याची ग्वाही*

रामदेव बाबा मंदिराचे पुजारी *हरिराम शर्मा* यांनी अमृतच्या योजनांच्या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंदिर परिसरात अमृतच्या योजनांची माहिती देणारे पोस्टर्स त्यांनी स्वतःहून लावून या उपक्रमाला सकारात्मक पाठिंबा दर्शविला

लातूर येथील रामदेव बाबा मंदिरातून अमृतच्या योजनांचा जनजागृती संदेश  *पुजारी हरिराम शर्मा यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्याची ग्वाही* मुख्य फोटो
मुख्य फोटो

रामदेव बाबा मंदिराचे पुजारी *हरिराम शर्मा* यांनी अमृतच्या योजनांच्या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंदिर परिसरात अमृतच्या योजनांची माहिती देणारे पोस्टर्स त्यांनी स्वतःहून लावून या उपक्रमाला सकारात्मक पाठिंबा दर्शविला. यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर* यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच *अमृतपेठ संदर्भात सविस्तर चर्चा* करण्यात आली. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि त्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी मंदिराच्या माध्यमातून सहकार्य करण्याची तयारी हरिराम शर्मा यांनी व्यक्त केली. *“अमृतच्या योजनांची माहिती जास्तीत जास्त जनांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन मदत करीन,”* अशी ग्वाही हरिराम शर्मा यांनी यावेळी दिली.

अमृतचे जिल्हा व्यवस्थापक *श्री. शुभम मुळजकर* यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या अमृतच्या उपक्रमाला मंदिराच्या माध्यमातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अधिक बळ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर

अमृत कार्यालय,लातूर

संपर्क क्रमांक- 7391065470

पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग,

मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर

तालुका, जिल्हा लातूर-413512


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement