परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांची अमृतच्या वतीने सदिच्छा भेट; विविध योजनांबाबत केली चर्चा

परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी सदिच्छा भेट घेऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आर्य वैश्य समाज संघर्ष समितीचे राजकुमार कौलावार व विवेक पार्सेवार उपस्थित होते.

परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांची अमृतच्या वतीने सदिच्छा भेट; विविध योजनांबाबत केली  चर्चा मुख्य फोटो
परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांची अमृतच्या वतीने सदिच्छा भेट; विविध योजनांबाबत केली  चर्चा अतिरिक्त फोटो

बीड प्रतिनिधी : परळी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी सदिच्छा भेट घेऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आर्य वैश्य समाज संघर्ष समितीचे राजकुमार कौलावार व विवेक पार्सेवार उपस्थित होते.

भेटीदरम्यान विशाल जोशी यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कौशल्य विकास कार्यक्रम, उद्योजकता विकास उपक्रम, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य योजना, अमृत पेठ, अमृत महाराष्ट्र तसेच इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. युवक, महिला, विद्यार्थी, उद्योजक आणि समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या उद्दिष्टांबाबतही त्यांनी माहिती दिली.

यावेळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांनी अमृतच्या कार्याचे कौतुक करत योजनांच्या व्यापक जनजागृतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अमृतच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व लक्षित गटांतील प्रमुख व्यक्तींची बैठक आयोजित करून योजनांची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

समाजातील विविध घटकांना शासनाच्या तसेच अमृतच्या योजनांची माहिती मिळणे आवश्यक असून त्यासाठी स्थानिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अमृतच्या विविध उपक्रमांना सकारात्मक सहकार्य राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकासाभिमुख उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement