बुलढाणा येथील मेहकर येथे अमृत संस्थेकडून मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP)

बुलढाणा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने मेहकर येथे 10 दिवसांचे मोफत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे.

बुलढाणा येथील मेहकर येथे अमृत संस्थेकडून मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) मुख्य फोटो
मुख्य फोटो

मेहकर येथे अमृत संस्थेकडून मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP)..... बुलढाणा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने मेहकर येथे 10 दिवसांचे मोफत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणात पुढील विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे : - व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन - चालू व्यवसायाचा विस्तार व व्यवसायवाढ - विक्री व नफा वाढविण्याचे तंत्र - ग्राहकसंख्या वाढविण्याच्या प्रभावी युक्त्या - डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग - प्रकल्प अहवाल तयार करणे - शासकीय योजना व बँक कर्जाबाबत माहिती - व्यवसायातील अडचणी व त्यावरील उपाययोजना

व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला, शेतकरी व इच्छुक नागरिकांनी या मोफत EDP प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : 📞 9112227637 अमृत बुलढाणा जिल्हा कार्यालय 305, तिसरा मजला, प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Nandakishor Magar News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 01:08 PM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Nandakishor Magar News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 01:08 PM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement