राष्ट्रसमर्पित विद्यार्थी घडविण्याचे कार्य भा.शि.प्र.संस्था करते -स्वप्निल चामणीकर _(श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात संस्था अमृत महोत्सव व संकुलाच्या हीरक महोत्सवा निमित्त गुणगौरव सोहळा संपन्न)

संस्कृती रूजली तर राष्ट्र उभा राहिल आणि या राष्ट्र उभारणीच्या कामाची जबाबदारी आपण समर्थपणे पूर्ण करत आहोत. हे या गुणवंतांच्या संख्येवरून दिसून येत आहे. हे गुणवंत म्हणजेच राष्ट्रसमर्पित कार्यकर्ते आहेत. हे राष्ट्र उभारणीतील कार्यकर्ता घडविण्याचे कार्य भा.शि.प्र. संस्था करते असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्निल चामणीकर यांनी केले.

राष्ट्रसमर्पित विद्यार्थी घडविण्याचे कार्य भा.शि.प्र.संस्था करते -स्वप्निल चामणीकर  _(श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात संस्था अमृत महोत्सव व संकुलाच्या हीरक महोत्सवा निमित्त गुणगौरव सोहळा संपन्न) मुख्य फोटो
राष्ट्रसमर्पित विद्यार्थी घडविण्याचे कार्य भा.शि.प्र.संस्था करते -स्वप्निल चामणीकर  _(श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात संस्था अमृत महोत्सव व संकुलाच्या हीरक महोत्सवा निमित्त गुणगौरव सोहळा संपन्न) अतिरिक्त फोटो

माजलगाव (प्रतिनिधी) संस्कृती रूजली तर राष्ट्र उभा राहिल आणि या राष्ट्र उभारणीच्या कामाची जबाबदारी आपण समर्थपणे पूर्ण करत आहोत. हे या गुणवंतांच्या संख्येवरून दिसून येत आहे. हे गुणवंत म्हणजेच राष्ट्रसमर्पित कार्यकर्ते आहेत. हे राष्ट्र उभारणीतील कार्यकर्ता घडविण्याचे कार्य भा.शि.प्र. संस्था करते असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्निल चामणीकर यांनी केले.

ते येथील श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात भा.शि.प्र. संस्था अमृत महोत्सव व संकुलाच्या हीरक महोत्सवा निमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,भा. शि.प्र.संस्था ज्ञानवर्धक शिक्षण देते. त्यामुळे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व घडवण्याचे काम करते.आपले शिक्षक व्यक्ती घडवण्याचे काम करतात. त्यामुळे बाह्यजगातील स्पर्धेत आपले विद्यार्थी टिकतात. समसामायिक दृष्टी देणारी ही संस्था आहे असे सांगितले. या प्रसंगी गुणवंतांचा गौरव करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य म्हणाले की,'संकुलाने अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे.परिपूर्ण राष्ट्रनिर्मिती साठी नागरिक घडवण्यासाठी संस्था कार्य करते.समाज राष्ट्र संस्कृती यासठी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे जबाबदारी आपल्यावर आहे. या जबाबदारीचे फलीत म्हणजे हे गुणवंत विद्यार्थी आहेत. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत व परिचय झाला. प्रातिनिधीक स्वरूपात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी झालेल्या रसिका देशमुख व स्वप्नाली देशमुख या दोन विद्यार्थीनींनी शाळेविषयी व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, प्रमुख अतिथी स्वप्नील चामणीकर (देवगिरी प्रांत प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तर व्यासपीठावर संस्थेचे सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक प्रकाश दुगड, सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिशुविहार, इयत्ता चौथी, आठवी शिष्यवृत्ती, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तसेच महाविद्यालयातील सर्व शाखांमधील गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. तर आभार पवन मानधने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे सर्व स्थानिक संस्था पदाधिकारी, सभासद, सर्व संस्कार केंद्र प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या शिक्षक संवादामध्ये स्वप्निल चामणीकर यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला.

अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर , लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच,

अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 02:22 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 02:22 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement