अमृतच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री. पवन पारडे जी यांची भेट घेण्यात आली. यावेळी अमृत व्याज परतावा योजना व EDP प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक समन्वयावर चर्चा झाली.
आर्वी: अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि प्रशिक्षण उपक्रमांची माहिती अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी बँक ऑफ इंडियाचे बँक मॅनेजर श्री. पवन पारडे जी यांची भेट घेण्यात आली.
यावेळी अमृतच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये अमृत व्याज परतावा योजनेवर विशेष भर देत योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी आवश्यक प्रक्रिया आणि बँकेच्या सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.
यासोबतच EDP (Entrepreneurship Development Programme) प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणातून इच्छुक युवक व नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते, याबाबत माहिती देण्यात आली.
अमृतच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकिंग क्षेत्राशी समन्वय वाढविणे आणि योजनांची योग्य माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरली. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, यावरही यावेळी भर देण्यात आला.
अमृतच्या योजना आणि प्रशिक्षण उपक्रमांची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचा संवाद पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. व्याज परतावा योजना आणि EDP प्रशिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध संधींचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, यासाठी आवश्यक मार्गदर्शन व समन्वय करण्यावर भर देण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment