अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी आर्य वैश्य समाज संघर्ष समितीचे राजकुमार कौलावार यांची सदिच्छा भेट घेऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विवेक पार्सेवार हे देखील उपस्थित होते.
प्रतिनिधी : अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी आर्य वैश्य समाज संघर्ष समितीचे राजकुमार कौलावार यांची सदिच्छा भेट घेऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विवेक पार्सेवार हे देखील उपस्थित होते.
भेटीदरम्यान विशाल जोशी यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कौशल्य विकास कार्यक्रम, उद्योजकता विकास उपक्रम, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य योजना, अमृत पेठ, अमृत महाराष्ट्र तसेच इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी राजकुमार कौलावार यांनी अमृतच्या योजनांची माहिती अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. काल दिवसभरात त्यांच्या पुढाकारातून परळी शहरातील अनेक व्यावसायिक तसेच आर्य वैश्य समाजातील बांधवांच्या भेटी घडवून आणण्यात आल्या. या भेटींमध्ये विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच युवक, महिला, विद्यार्थी आणि उद्योजकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
राजकुमार कौलावार यांनी पुढील काळातही अमृतच्या योजनांच्या जनजागृतीसाठी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समाजातील विविध घटकांना शासनाच्या व अमृतच्या योजनांची माहिती मिळण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या प्रसंगी विवेक पार्सेवार यांनीही योजनांच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. अमृतच्या विविध विकासाभिमुख उपक्रमांना समाजातून मिळणारा प्रतिसाद अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment