संभाजीनगर येथे अमृत EDP प्रशिक्षणात बँकिंग व कर्ज प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन

अमृत उद्यम कौशल्य वर्धन (EDP) कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी बँकिंग विषयावर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. देवगिरी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापक सौ. संजीवनी शेजुळ व लोन अधिकारी सौ. प्राची वेताळ यांनी कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कर्ज मंजुरी व विविध बँकिंग योजनांची माहिती दिली.

संभाजीनगर येथे अमृत EDP प्रशिक्षणात बँकिंग व कर्ज प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन मुख्य फोटो
संभाजीनगर येथे अमृत EDP प्रशिक्षणात बँकिंग व कर्ज प्रक्रियेबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

अमृत संस्थेच्या विभागीय व जिल्हा कार्यालयात आयोजित अमृत उद्यम कौशल्य वर्धन (EDP) कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी बँकिंग विषयावर मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बँकिंग व कर्ज सुविधांबाबत लाभार्थ्यांना यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

देवगिरी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापक सौ. संजीवनी सतीश शेजुळ तसेच लोन अधिकारी सौ. प्राची वेताळ यांनी व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेताना आवश्यक असलेली प्रक्रिया, कर्जासाठी लागणारी विविध कागदपत्रे, कर्ज मंजुरीची प्रक्रिया तसेच बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली.

व्यवसायासाठी योग्य आर्थिक नियोजन आणि बँकिंग सुविधांचा प्रभावी वापर याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अमृतच्या विविध योजनांची माहिती जिल्हा उपव्यवस्थापक श्री. योगेश रोडे यांनी लाभार्थ्यांना दिली. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्न व शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले.

कार्यक्रमास अमृत सखी मंजू कुलकर्णी, रुचा शर्मा तसेच महिला ब्राह्मण महासंघाच्या विजया कुलकर्णी यांची उपस्थिती होती. लाभार्थ्यांनी मार्गदर्शन सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यवसायविषयक माहिती जाणून घेतली.

व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांसोबतच आर्थिक व बँकिंग ज्ञान मिळाल्याने EDP प्रशिक्षणाचा चौथा दिवस लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 31-08-2026 News publication date | Time: 01:27 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 31-08-2026 News publication date | Time: 01:27 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement