लातूर येथील अमृत जिल्हा कार्यालयास औसा येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते *प्रणव नागराळे* यांनी सदिच्छा भेट देऊन अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी अमृतच्या माध्यमातून लिंगायत समाजातील युवक, विद्यार्थी, महिला तसेच उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
*लातूर :* लातूर येथील अमृत जिल्हा कार्यालयास औसा येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते *प्रणव नागराळे* यांनी सदिच्छा भेट देऊन अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी अमृतच्या माध्यमातून लिंगायत समाजातील युवक, विद्यार्थी, महिला तसेच उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अमृतच्या योजनांची माहिती घेतल्यानंतर *औसा तालुक्यात लिंगायत समाजाची बैठक आयोजित करून समाजातील नागरिकांपर्यंत अमृतच्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी पुढाकार घेऊ*, असे प्रणव नागराळे यांनी सांगितले. तसेच पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जनजागृती करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर* यांनी अमृतच्या विविध योजनांची माहिती देत समाजातील युवकांनी शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. *जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी* यांनी योजनांची अंमलबजावणी व लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी *अमृत मित्र अमित पांडे* उपस्थित होते. औसा तालुक्यात लिंगायत समाजाची बैठक घेण्याच्या पुढाकारामुळे अमृतच्या योजनांचा व्यापक प्रसार होऊन अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment