या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या काळातील विविध सण, उत्सव, यात्रा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर समारंभांमुळे निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधींचा सखोल अभ्यास आणि प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सण-उत्सवांच्या काळात वाढणारी ग्राहकांची मागणी, त्यानुसार व्यवसायाची निवड, उत्पादन व सेवा नियोजन, सजावट, खाद्यपदार्थ, पॅकेजिंग, भेटवस्तू, डिजिटल सेवा, इव्हेंटशी संबंधित व्यवसाय तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध व्यवसाय संधींचा प्रत्यक्ष अभ्यास प्रशिक्षणार्थींना करून देण्यात येणार आहे.
अमृतच्या विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षणाची नवीन बॅच ७ सप्टेंबरपासून सण-उत्सव आणि विविध कार्यक्रमांतून निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधींवरही मिळणार प्रात्यक्षिक प्रशिक्षण जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने जालना जिल्ह्यातील लक्षित गटातील युवक-युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची (EDP) नवीन बॅच दि. ७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी सक्षम करून त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या काळातील विविध सण, उत्सव, यात्रा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर समारंभांमुळे निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधींचा सखोल अभ्यास आणि प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सण-उत्सवांच्या काळात वाढणारी ग्राहकांची मागणी, त्यानुसार व्यवसायाची निवड, उत्पादन व सेवा नियोजन, सजावट, खाद्यपदार्थ, पॅकेजिंग, भेटवस्तू, डिजिटल सेवा, इव्हेंटशी संबंधित व्यवसाय तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध व्यवसाय संधींचा प्रत्यक्ष अभ्यास प्रशिक्षणार्थींना करून देण्यात येणार आहे.
‘संधी ओळखा, व्यवसाय उभा करा आणि रोजगार निर्माण करा’ या दृष्टिकोनातून प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास करून अल्प भांडवलात कोणते व्यवसाय सुरू करता येतील, सण-उत्सवांच्या काळात उपलब्ध होणाऱ्या हंगामी व्यवसाय संधींचा कसा फायदा घेता येईल, ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन व सेवा कशा विकसित करता येतील, याबाबत प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक माहिती देण्यात येणार आहे.
यासोबतच उद्योग व्यवसायाची योग्य निवड, बाजारपेठेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणे, बँक कर्ज प्रस्ताव तयार करणे, MSME नोंदणी, विविध शासकीय अनुदान व कर्ज योजनांची माहिती, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, GST, व्यवसायासाठी आवश्यक परवाने आणि आर्थिक नियोजन या महत्त्वाच्या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
लक्षित गटातील पात्र युवक-युवती, नवउद्योजक, महिला उद्योजिका तसेच ग्रामीण व शहरी भागातील स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः आगामी सण-उत्सव आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या तसेच दीर्घकालीन व्यवसायाच्या संधींचा योग्य पद्धतीने लाभ घेण्यासाठी हे प्रशिक्षण मार्गदर्शक ठरणार आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून लक्षित गटातील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विविध कौशल्य विकास व उद्योजकता विकास उपक्रम राबविले जात आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःच्या कल्पना, कौशल्य आणि उपलब्ध बाजारपेठेतील संधींचा उपयोग करून रोजगार निर्माण करणारे सक्षम उद्योजक बनावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या नवीन बॅचचा इच्छुक युवक-युवतींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि आपल्या व्यवसायाच्या स्वप्नाला प्रत्यक्ष दिशा द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment