लातूर चे उद्योजक डॉ. विवेक कुलकर्णी यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट

समाजातील युवक, उद्योजक व विविध घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या अमृत कार्यालयास लातूर येथील उद्योजक श्री. डॉ. विवेक कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अमृत मित्र अमित पांडे व श्री. ओंकार कुलकर्णी उपस्थित होते.

लातूर चे उद्योजक डॉ. विवेक कुलकर्णी यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : समाजातील युवक, उद्योजक व विविध घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या अमृत कार्यालयास लातूर येथील उद्योजक श्री. डॉ. विवेक कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अमृत मित्र अमित पांडे व श्री. ओंकार कुलकर्णी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर यांनी डॉ. विवेक कुलकर्णी यांना अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अमृत पेठ याबाबत सविस्तर माहिती दिली. योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमृतच्या वतीने करण्यात येत असलेल्या जनजागृती व मार्गदर्शन उपक्रमांचीही माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी अमृतच्या विविध योजनांची कार्यपद्धती व लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत माहिती दिली. युवकांनी विविध योजनांचा लाभ घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, याबाबतही चर्चा करण्यात आली.

डॉ. विवेक कुलकर्णी यांनी अमृतच्या कार्याची व विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत अमृतच्या माध्यमातून समाजातील युवक व उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच अमृतच्या योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली.


यावेळी अमृत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 91 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 91 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement