उदगीर येथील दत्तात्रय होन्ना यांची अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट

उदगीर येथील दत्तात्रय होन्ना यांनी अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर यांनी अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

उदगीर येथील दत्तात्रय होन्ना यांची अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर;उदगीर येथील दत्तात्रय होन्ना यांनी अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जाणून घेतली. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर यांनी अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत तसेच पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत मार्गदर्शन केले. अमृत मित्र श्री. अमित पांडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

उदगीर परिसरातील युवक, विद्यार्थी व समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत अमृतच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृती व सहकार्य करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. दत्तात्रय होन्ना यांनी अमृतच्या उपक्रमांना सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.


अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 01:14 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 01:14 PM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement