७ व ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘अमृत पेठ’ नागरिकांसाठी खुली राहणार आहे. परभणीकरांनी कुटुंबासह या बाजारपेठेला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
परभणी : गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या वतीने ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजी कौस्तुभ मंगल कार्यालय, जायकवाडी वसाहतीजवळ, परभणी येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत ही बाजारपेठ भरविण्यात येणार आहे.
या दोन दिवसीय बाजारपेठेत विविध लघुउद्योजक व व्यावसायिकांकडून दर्जेदार आणि स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये साड्या व कपडे, ज्वेलरी, आर्ट व हॅन्डमेड वस्तू, घरगुती पदार्थ, किड्स आयटेम्स, विविध खाद्यपदार्थ तसेच सोलर आणि इन्शुरन्स सेवांचा समावेश असणार आहे. त्यामुळे गौरी-गणपती सणासाठी आवश्यक विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी परभणीकरांना मिळणार आहे.यासोबतच नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती तसेच योजनांसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे खरेदीसोबतच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.दरम्यान, लघुउद्योजकांसाठीही ‘अमृत पेठ’ ही आपल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची आणि व्यवसायवृद्धीची उत्तम संधी ठरणार आहे. इच्छुक उद्योजकांनी आपला स्टॉल बुक करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
अधिक माहितीसाठी अनिरुद्ध काटे, जिल्हा व्यवस्थापक, अमृत परभणी – ७३९१०६५४७३ तसेच स्टॉल बुकिंगसाठी पंकज पुरोहित – ९४०५३१९९९९ यांच्याशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment