डिजिटल बँकिंगचा वाढता वापर लक्षात घेता मोबाईल हॅकिंग, बनावट फोन कॉल, फसव्या लिंक तसेच अनोळखी अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि., लातूरचे शाखाधिकारी श्री. सिद्धेश्वर पवार यांनी केले आहे.
लातूर : डिजिटल बँकिंगचा वाढता वापर लक्षात घेता मोबाईल हॅकिंग, बनावट फोन कॉल, फसव्या लिंक तसेच अनोळखी अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि., लातूरचे शाखाधिकारी श्री. सिद्धेश्वर पवार यांनी केले आहे.
अलीकडील काळात सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून खातेदारांच्या बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे डिजिटल बँकिंगचा वापर करताना खातेदारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. OTP, PIN, UPI PIN, पासवर्ड, ATM/डेबिट कार्ड क्रमांक किंवा CVV यांसारखी गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये. बँक अधिकारी किंवा कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीलाही ही माहिती देऊ नये. SMS, WhatsApp किंवा ई-मेलद्वारे आलेल्या अनोळखी अथवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. तसेच अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून AnyDesk, TeamViewer, QuickSupport यांसारखे Remote Access अॅप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करू नयेत. अशा माध्यमातून सायबर गुन्हेगार मोबाईलचा अनधिकृत ताबा घेऊन आर्थिक फसवणूक करू शकतात.
खातेदारांनी मोबाईलची Operating System तसेच बँकिंग अॅप्स नेहमी अपडेट ठेवावीत. सार्वजनिक किंवा ओपन Wi-Fi नेटवर्कवरून आर्थिक व्यवहार करणे टाळावे. बँक कधीही फोनवरून OTP, UPI PIN, पासवर्ड, ATM/डेबिट कार्ड क्रमांक किंवा CVV मागत नाही, त्यामुळे अशा फसव्या कॉलला बळी पडू नये, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
आपल्या खात्यातून कोणताही अनधिकृत व्यवहार झाल्याचे आढळल्यास किंवा मोबाईल हरवल्यास खातेदारांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधावा. सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
“डिजिटल व्यवहार करताना थोडीशी सावधगिरी मोठे आर्थिक नुकसान टाळू शकते. त्यामुळे खातेदारांनी कोणत्याही आमिषाला किंवा फसव्या कॉलला बळी न पडता आपल्या बँकिंग माहितीची गोपनीयता जपावी,” असे आवाहन शाखाधिकारी श्री. सिद्धेश्वर पवार यांनी केले.
— लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि., लातूर
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment