गडचिरोली येथे अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षणा मुळे घडणार आरमोरी शहरामध्ये नवे उद्योजक

गडचिरोली मध्ये घडणार नवे उद्योजक.

गडचिरोली येथे अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षणा मुळे  घडणार आरमोरी शहरामध्ये  नवे उद्योजक मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत द्वारे राबविण्यात येणाऱ्या 'अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्गा'मुळे राज्यभरात अनेक नवे उद्योजक घडविण्यात आले, नागरिकांना विविध व्यावसायिक क्षेत्राचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं कार्य अमृत ने साकार केले आहे.

याच कार्याला प्रबळ करण्याकरिता ,गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यामध्ये नवे उद्योजक घडावे याकरिता गृह उद्योग बॅचचे उद्घाटन 02 सप्टेंबर, 2026 रोजी होत आहे. या बॅचमध्ये 12 प्रशिक्षणार्थी असून ही बॅच स्वयंरोजगार व आत्मनिर्भरता या विषयांना प्रबळ करेल.

माननीय जिल्हा व्यवस्थापक अमृत ,गडचिरोली श्री विक्रम जी पांडे , अमृतमित्र वेदांत मेहता व प्रशिक्षक श्री समीर सहारे आणि सर्व प्रशिक्षणार्थी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


Website:- app.mahaamrut.org.in

Publisher: वेदांत सुनील मेहता News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 05:05 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news
Publisher: वेदांत सुनील मेहता News publisher name | Date: 01-09-2026 News publication date | Time: 05:05 PM News publication time | Views: 90 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement