आर्वी येथे EDP प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्योजकतेच्या विविध पैलूंवर लाभार्थींना मार्गदर्शन

आर्वी येथे अमृतच्या माध्यमातून EDP प्रशिक्षण बॅचला दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी GST, Income Tax, Accounting, Bank Loan, Financial Planning व Project Report Financials या विषयांवर, तर दुसऱ्या दिवशी Branding, Marketing व Packaging या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

आर्वी येथे EDP प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्योजकतेच्या विविध पैलूंवर लाभार्थींना मार्गदर्शन मुख्य फोटो
आर्वी येथे EDP प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; उद्योजकतेच्या विविध पैलूंवर लाभार्थींना मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

आर्वी, दि. २ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून आर्वी येथे EDP (Entrepreneurship Development Programme) प्रशिक्षण बॅचला उत्साहात सुरुवात झाली. दि. १ सप्टेंबर रोजी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक धीरज राठी, EDP प्रशिक्षक सीए आशिष जी. मालवे तसेच अमृत मित्र आनंदाचे झाडे उपस्थित होते.

उद्घाटनावेळी लाभार्थींना अमृतच्या विविध योजना व EDP प्रशिक्षणाचा उद्देश याबाबत माहिती देण्यात आली. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि योग्य आर्थिक नियोजनाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.

पहिल्या दिवशी GST, Income Tax, Accounting, Bank Loan, Financial Planning आणि Project Report Financials या विषयांवर सीए आशिष जी. मालवे यांनी मार्गदर्शन केले. व्यवसायातील आर्थिक व्यवहार, करप्रणाली, बँक कर्ज प्रक्रिया, आर्थिक नियोजन आणि प्रकल्प अहवालातील आर्थिक बाबी याबाबत लाभार्थींना उपयुक्त माहिती मिळाली.

दि. २ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी Branding, Marketing आणि Packaging या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश जी. खराटे उपस्थित होते. उत्पादनाची ओळख निर्माण करणे, ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे, बाजारपेठेचा योग्य वापर आणि आकर्षक पॅकेजिंगचे महत्त्व याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अमृत मित्र आनंदाचे झाडे यांचीही उपस्थिती होती.

दोन दिवसीय प्रशिक्षणाला लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यवसायाच्या आर्थिक नियोजनापासून ब्रॅण्डिंग, मार्केटिंग आणि पॅकेजिंगपर्यंतच्या विविध महत्त्वपूर्ण बाबींचे मार्गदर्शन मिळाल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 04:54 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news
Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 04:54 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement