अमृतच्या माध्यमातून लक्षित गटातील अंध-अपंग बांधवांच्या *कौशल्यविकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी* राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित *स्वाधार अंध-अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र, बुधोडा, ता. औसा, जि. लातूर* येथील *हरिशजी काळे व दयानंद बोराडे, प्रकल्प समन्वयक, ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान* यांनी लातूर येथील अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
लातूर : अमृतच्या माध्यमातून लक्षित गटातील अंध-अपंग बांधवांच्या कौशल्यविकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार अंध-अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र, बुधोडा, ता. औसा, जि. लातूर येथील *हरिशजी काळे व दयानंद बोराडे, प्रकल्प समन्वयक, ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान यांनी लातूर येथील अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री. अमित पांडे यांनी स्वाधार केंद्राच्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
भेटीदरम्यान अमृतच्या माध्यमातून लक्षित गटासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कौशल्यविकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योजकता विकास तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. स्वाधार केंद्राच्या माध्यमातून अंध-अपंग व्यक्तींना दिले जाणारे प्रशिक्षण व पुनर्वसनाचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी अमृतच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा झाली.
अंध-अपंग बांधवांना केवळ मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, हा चर्चेचा प्रमुख विषय होता. प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध योजनांचा योग्य समन्वय साधल्यास लक्षित गटातील दिव्यांग बांधवांसाठी रोजगार व व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, असे यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच, अमृत आणि ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून लक्षित गटातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी भविष्यात परस्पर समन्वयाने कार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. स्वाधार केंद्रातील लाभार्थ्यांना अमृतच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
या भेटीमुळे लक्षित गटातील अंध-अपंग बांधवांच्या कौशल्यविकासाला, स्वयंरोजगाराला आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी अमृत व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान यांच्या समन्वयातून सकारात्मक उपक्रमांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment