अमृत-आयजीटीआरतर्फे खुल्या प्रवर्गातील युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम ; प्रशिक्षण, निवास व भोजन पूर्णपणे मोफत; औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळूज येथे प्रशिक्षण

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर-इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित घटकांतील युवक-युवतींसाठी ४२ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासोबत निवास व भोजनाची सुविधाही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अमृत-आयजीटीआरतर्फे खुल्या प्रवर्गातील युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम ; प्रशिक्षण, निवास व भोजन पूर्णपणे मोफत; औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळूज येथे प्रशिक्षण मुख्य फोटो
अमृत-आयजीटीआरतर्फे खुल्या प्रवर्गातील युवकांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम ; प्रशिक्षण, निवास व भोजन पूर्णपणे मोफत; औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळूज येथे प्रशिक्षण अतिरिक्त फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर-इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर), छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित घटकांतील युवक-युवतींसाठी ४२ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासोबत निवास व भोजनाची सुविधाही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविते. तर आयजीटीआर, छत्रपती संभाजीनगर हे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत अग्रगण्य तंत्रज्ञान व कौशल्य प्रशिक्षण केंद्र असून सीएडी-सीएएम, सीएनसी, ऑटोमेशन, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल क्षेत्रातील उद्योगाभिमुख प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

या उपक्रमांतर्गत एकूण ४२ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये ३० अल्पकालीन तांत्रिक कौशल्य अभ्यासक्रम आणि १२ मध्यम व दीर्घकालीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ऑटो कॅड, सॉलिडवर्क्स, कॅटिया, क्रिओ, अॅन्सिस, सीएनसी मशीनिंग, थ्री-डी प्रिंटिंग, पीएलसी प्रोग्रामिंग, स्काडा, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, एम्बेडेड सिस्टिम्स, ई-कॅड, रेविट आर्किटेक्चर, स्टॅड प्रो, टोटल स्टेशन सर्व्हे यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावरील अभ्यासक्रमांसह टूल अँड डाय मेकर, सीएनसी ऑपरेटर, सीएनसी प्रोग्रामर, मेकॅट्रॉनिक्स सिस्टिम डिझायनर, मशीन मेंटेनन्स आणि ऑटोमेशन क्षेत्रातील रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोण उमेदवार पात्र?

ही योजना महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित घटकांतील युवक-युवतींसाठी आहे. ब्राह्मण, बनिया, राजपूत, कायस्थ, पाटीदार, मारवाडी, हिंदू लिंगायत, वीरशैव लिंगायत, गुजराथी, जाट, सिंधी, कानबी, कोमटी, आर्य वैश्य आदी समाजघटकांतील पात्र युवक-युवती या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी संबंधित समाजघटकाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.प्रशिक्षण केंद्रे

हे प्रशिक्षण छत्रपती सांभाजीनगर, वाळूज, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी दहावी, आयटीआय, पदविका, पदवी तसेच अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, समाजघटकाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अथवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र, छायाचित्र व स्वाक्षरी सादर करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२६ असून १२ सप्टेंबर २०२६ रोजी पात्रता परीक्षा, कागदपत्र पडताळणी व मुलाखत होणार आहे. प्रशिक्षणास १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे.

प्रशिक्षण, निवास व भोजन मोफत या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र युवक-युवतींना आधुनिक उद्योगक्षेत्रात आवश्यक असलेल्या सीएनसी, टूल अँड डाय, सीएडी-सीएएम, मेकॅट्रॉनिक्स, मशीन मेंटेनन्स आणि ऑटोमेशन यांसारख्या क्षेत्रांत अत्याधुनिक प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण शुल्कासोबत निवासी प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी निवास व भोजनाची सुविधाही अमृतमार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीतील क्यूआर कोड अथवा खालील ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज लिंक : https://forms.gle/KHxvhJZ4PkcoGTuc7 पात्र व इच्छुक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन अमृत, लातूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 01:52 PM News publication time | Views: 149 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 01:52 PM News publication time | Views: 149 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement