नायगांव (जि. नांदेड) येथे अमृत संस्थेतर्फे आयोजित उद्योग कौशल्य वर्धन (EDP) प्रशिक्षणाच्या आठव्या दिवशी नांदेड मर्चंट बँकेचे नायगाव शाखा अधिकारी श्री. श्रीकांत गावकरे यांनी प्रशिक्षणार्थींना बँक कर्जप्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
नायगांव (जि. नांदेड) येथे अमृत संस्थेतर्फे आयोजित उद्योग कौशल्य वर्धन (EDP) प्रशिक्षणाच्या आठव्या दिवशी नांदेड मर्चंट बँकेचे नायगाव शाखा अधिकारी श्री. श्रीकांत गावकरे यांनी प्रशिक्षणार्थींना बँक कर्जप्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नायगांव येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे जिल्हा समन्वयक श्री. हानमंत रंगा, संघाचे आध्यात्मिक प्रमुख श्री. बाबुरावजी वडजे, औद्योगिक संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य श्री. सदानंद चुटेवाट, श्री. लक्ष्मण बुद्धलवाड आणि विजतंत्री निदेशक श्री. जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी मुख्य मार्गदर्शक श्री. गावकरे यांची ओळख करून देत त्यांचा सत्कार केला. यानंतर श्री. सदानंद चुटेवाट व श्री. हानमंत रंगा यांनी अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शनादरम्यान श्री. गावकरे यांनी बँक कर्जाचे विविध प्रकार आणि योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने: * मुद्रा लोन (MUDRA Loan) * टर्म लोन (Term Loan) * कॅश क्रेडिट (Cash Credit) * CMEGP व PMEGP योजना * कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
या सर्व बाबींवर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. सत्राच्या शेवटी प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. बँक कर्जाविषयी मिळालेल्या या अत्यंत उपयुक्त व महत्त्वपूर्ण माहितीबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींनी अमृत संस्थेचे मनापासून आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment