अमृत स्वायत्त संस्थेच्या वतीने स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी *उद्योजकता विकास प्रशिक्षण (Entrepreneurship Development Programme – EDP)* कार्यक्रमाची नवीन १० दिवसांची प्रशिक्षण बॅच *५ सप्टेंबर २०२६ पासून* सुरू होणार आहे.
*लातूर :* अमृत स्वायत्त संस्थेच्या वतीने स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी *उद्योजकता विकास प्रशिक्षण (Entrepreneurship Development Programme – EDP)* कार्यक्रमाची नवीन १० दिवसांची प्रशिक्षण बॅच *५ सप्टेंबर २०२६ पासून* सुरू होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले *व्यवसाय नियोजन, व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, शासकीय योजना व कर्ज सुविधा* याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींमध्ये आवश्यक *उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यावर* भर दिला जाणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसह विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. व्यवसायाची योग्य निवड, नियोजन, आर्थिक व्यवस्थापन तसेच बाजारपेठेतील उपलब्ध संधी याबाबत प्रशिक्षणातून व्यावहारिक मार्गदर्शन मिळणार आहे. या १० दिवसांच्या प्रशिक्षणातून इच्छुक उद्योजकांना *व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मार्गदर्शन* मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी *लवकरात लवकर नोंदणी करावी*, असे आवाहन अमृतच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,
लातूर अमृत कार्यालय,लातूर
संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,
सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका,
जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment