नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला हि आता आपला स्वतःचा व्यवसाय करतील : मंगेशजी खाडिलकर
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील व तालुक्यातील महिलांना अमृत संस्थे मार्फत एक मोठी संधी मिळाली आहे स्वतःचा व्यवसाय करता यावा म्हणून अमृत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उदघाट्न आज मा. विभागीय व्यवस्थापक श्री मंगेशजी खाडिलकर सर यांचा हस्ते करण्यात आल.जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी त्यांचा स्वागत करून कार्यक्रमाला सुरवात केली मंगेशजींनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देऊन व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षणार्थींना सांगितल्या.
शहादा तालुक्यातील १५ महिला घेतील ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा लाभ यावेळी जिल्हा उपव्यवस्थापक कार्तिक तोमर, कविता गिरासे, राजपूत समाज प्रमुख दीपाली ताई राजपूत हे मान्यवर उपस्थित होते.. शहादा शहारा लगत MIDC भागात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी. अमृत जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे 9112228771
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment