DBU आणि BBNA ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली ब्राह्मण सभा हॉल येथे आयोजित उद्योजक मीटिंगमध्ये अमृत संस्थेचे सविस्तर प्रेझेंटेशन करण्यात आले.
DBU आणि BBNA ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली ब्राह्मण सभा हॉल येथे आयोजित उद्योजक मीटिंगमध्ये अमृत संस्थेचे सविस्तर प्रेझेंटेशन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सर्व उद्योजकांचे प्रेझेंटेशन झाल्यानंतर अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित उद्योजकांना देण्यात आली. विशेषतः उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP), RAMP प्रशिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच इतर रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमांमध्ये डोंबिवली आणि ठाण्याचे उद्योजक सहभागी होते. उद्योजकांना उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणाच्या संधी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी अमृतच्या विविध योजनांमध्ये सहभागी होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी BBNA संस्थापक जितेंद्रजी बजाज यांनी युवक-युवतींसाठी अशा प्रकारचे उद्योजकता व कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करून त्यांना प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे मत मांडण्यात आले. DBU आणि BBNA ठाणे यांनी उद्योजकांना अमृत योजनांचा लाभघ्यावा असे अहवाण केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी DBU चे संस्थापक केदार पाध्ये, अध्यक्षा श्रुती आठल्ये, रूपाली बापट, मनोज खाडीलकर ,आणि अभय कुलकर्णी, ठाण्याचे BBNA चे संस्थापक जितेंद्रजी बजाज सर, तसेच यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शुभांगी ताई देवधर-दिवटे यांचेही मार्गदर्शन लाभले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment