अहिल्यानगर मधील केडगाव येथील प्रदर्शना मध्ये अमृत संस्थे च्या स्टॉल च्या माध्यमातून जनजागृतीव नोंदणी करण्यात आली.
अहिल्यानगर मधील केडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय येथे "तेजस्विनी महिला संघ व "बॉण्ड संघटना "यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय प्रदर्शन दिनांक 05 सप्टेंबर रोजी आयोजित केले होते..
उदघाटन उद्योजक व भाजपा चे अहिल्यानगर शहर जिल्हाअध्यक्ष मा अनिल मोहिते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्तितीत अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे, लोकमत चे मुख्य उपसंपादक मा सुदाम देशमुख,तेजस्विनी महिला संघ चे अध्यक्ष सौ जोशी मॅडम, ब्राहमण संघ अध्यक्ष मा नंदकुमार पोळ तसेच बॉण्ड संघटनेचे मा.सचिन फाटक, मा.श्रीपाद फाटक,मा. मुकेश साठ्ये, मा. नचिकेत रसाळ आदी उपस्थित होते.
यामध्ये एकूण 35 स्टॉल धारकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यामध्ये अमृत संस्थेचा प्रथमस्थानी स्टॉल लावण्यात आला. अमृत संस्थेच्या योजना यामध्यमातून केडगाव उपनगरातील अमृत संस्थेच्या लक्षित गटा पर्यंत पोहचवीणे हा मुख्य उद्देश होता. अनेक लक्षित गटातील महिला/पुरुष व विद्यार्थी यांची नोंदणी करण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment