जालना येथे पाईप क्लीनरपासून शोभेच्या वस्तू निर्मिती प्रशिक्षणाचा शुभारंभ

महिलांच्या अंगी असलेल्या कौशल्याला व्यवसायाची दिशा देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. सण-उत्सव तसेच विविध समारंभांच्या काळात सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. ही बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन महिलांना पाईप क्लीनरपासून आकर्षक व विक्रीयोग्य वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

केवळ वस्तू निर्मितीपुरते प्रशिक्षण मर्यादित न ठेवता व्यवसायाची निवड, योग्य बाजारपेठेची निवड, उत्पादनाचे नियोजन, व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय योजना, व्यवसायातील ताळेबंदी व हिशोब, टॅक्स, कर्ज प्रकरण तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्ये याबाबतही सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जालना येथे पाईप क्लीनरपासून शोभेच्या वस्तू निर्मिती प्रशिक्षणाचा शुभारंभ मुख्य फोटो
जालना येथे पाईप क्लीनरपासून शोभेच्या वस्तू निर्मिती प्रशिक्षणाचा शुभारंभ अतिरिक्त फोटो

जालना येथे पाईप क्लीनरपासून शोभेच्या वस्तू निर्मिती प्रशिक्षणाचा शुभारंभ

जालना, दि. ७ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने अमृतच्या लक्षित गटातील महिलांसाठी पाईप क्लीनरपासून विविध प्रकारची फुले, फ्लावर पॉट, हार तसेच आकर्षक शोभेच्या वस्तू बनविण्याच्या प्रशिक्षण बॅचचा शुभारंभ जालना येथे करण्यात आला.

महिलांच्या अंगी असलेल्या कौशल्याला व्यवसायाची दिशा देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. सण-उत्सव तसेच विविध समारंभांच्या काळात सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. ही बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन महिलांना पाईप क्लीनरपासून आकर्षक व विक्रीयोग्य वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

केवळ वस्तू निर्मितीपुरते प्रशिक्षण मर्यादित न ठेवता व्यवसायाची निवड, योग्य बाजारपेठेची निवड, उत्पादनाचे नियोजन, व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय योजना, व्यवसायातील ताळेबंदी व हिशोब, टॅक्स, कर्ज प्रकरण तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्ये याबाबतही सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामुळे महिलांना घरातून व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त होऊन स्वतःच्या उत्पादनाची निर्मिती, विक्री आणि बाजारपेठेशी जोडणी करण्यास चालना मिळणार आहे. कौशल्य विकासासोबतच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे, प्रशिक्षिका सौ. लांडगे मॅडम आणि अमृत सखी जान्हवी देशपांडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी महिलांना शुभेच्छा देत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 07-09-2026 News publication date | Time: 05:33 PM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement