सोलापूर जिल्हा कार्यालयात ‘अमृत’तर्फे उद्योजकता विकास कार्यक्रमाचा पहिला दिवस उत्साहात संपन्न!
सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचा (EDP) पहिला दिवस काल (७ सप्टेंबर) अतिशय उत्साहात पार पडला. सायंकाळी ६:३० ते ८:३० या वेळेत या विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान सुतार सर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना “स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा, व्यवसायाचे नियोजन कसे करावे आणि तो योग्य पद्धतीने कसा चालवावा” यावर अत्यंत सविस्तर व मार्गदर्शनपर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना उद्योजकतेच्या विविध पैलूंची स्पष्टता मिळाली.
या प्रसंगी खत्री सर, सुतार सर, जिल्हा व्यवस्थापक श्रेयस कुलकर्णी, उपव्यवस्थापक बिरुदेव वाघमोडे, तसेच इतर प्रमुख सदस्य व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच दिवशी उपस्थितांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि चर्चांमुळे कार्यक्रमात विशेष उत्साह पाहायला मिळाला.
पत्ता:
१०८ A, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला,
यतीराज हॉटेलच्या पुढे, सात रस्ता, मोदीखाना,
सोलापूर - ४१३००१.
संपर्क क्रमांक: ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment