शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून जीवन घडवणारा शिल्पकार आहे असे प्रतिपादन श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्य श्रीमती स्नेहल पाठक यांनी केले.त्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड उपस्थित होते.
माजलगाव, दि. ५ (प्रतिनिधी) - शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून जीवन घडवणारा शिल्पकार आहे असे प्रतिपादन श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्य श्रीमती स्नेहल पाठक यांनी केले.त्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड उपस्थित होते.
पुढे बोलतानात्या म्हणाल्या की, "शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारा शिल्पकार आहे. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी शिक्षकाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनात मूल्ये रुजवली पाहिजेत. माझ्या प्रदीर्घ सेवाकाळात या महाविद्यालयाने मला भरभरून प्रेम दिले, याचा मला अभिमान आहे."
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी यांनी शिक्षक दिनाविषयी विस्तृत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षकाला समाजात सर्वोच्च स्थान दिले. शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता आहे. आजच्या बदलत्या काळात शिक्षकांनी काळानुरूप बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे. विद्यार्थ्यांनीही गुरुजनांचा आदर करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करावा."
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड म्हणाले की, "भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षकांचे ऋण कधीही फेडता येत नाही. या महाविद्यालयातील शिक्षकांनी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य दिले आहे." त्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ. गोरक्षनाथ फसले यांनी केले. त्यांनी शिक्षक दिनाचा इतिहास व महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन डॉ. सिताराम इंगोले यांनी केले तर आभार डॉ. ज्ञानेश्वर गवते यांनी मानले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. गजानन होंन्ना, डॉ. युवराज मुळये, पर्यवेक्षक प्रा परमेश्वर खेत्री, प्रा. अंकुश साबळे, कार्यालय अधीक्षक श्री. उत्तरेश्वर आनेवार तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप शांती मंत्राने करण्यात आला.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment