पाईप क्लीनरपासून शोभेच्या वस्तू बनविणाऱ्या प्रशिक्षणार्थींना रोजगार मार्गदर्शन

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने सुरू असलेल्या पाईप क्लीनरपासून फुले, पुष्पगुच्छ व शोभेच्या वस्तू बनविण्याच्या प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी प्रशिक्षणार्थींनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथे भेट दिली.

पाईप क्लीनरपासून शोभेच्या वस्तू बनविणाऱ्या प्रशिक्षणार्थींना रोजगार मार्गदर्शन मुख्य फोटो
पाईप क्लीनरपासून शोभेच्या वस्तू बनविणाऱ्या प्रशिक्षणार्थींना रोजगार मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने सुरू असलेल्या पाईप क्लीनरपासून फुले, पुष्पगुच्छ व शोभेच्या वस्तू बनविण्याच्या प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी प्रशिक्षणार्थींनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथे भेट दिली.

यावेळी प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणातून तयार केलेली फुले व पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांना भेट देत आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले. रोजगार मार्गदर्शन अधिकारी डॉ. अमोल परिहार व अधिकारी श्री. विशाल बोरकर यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत रोजगाराच्या विविध संधी, आवश्यक कौशल्ये व उपलब्ध मार्गदर्शनाबाबत माहिती दिली.

प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून रोजगारासोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे, प्रशिक्षिका सौ. सुमन लांडगे, अमृत सखी जान्हवी देशपांडे तसेच कौशल्य विकास केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 11-09-2026 News publication date | Time: 10:48 PM News publication time | Views: 109 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 11-09-2026 News publication date | Time: 10:48 PM News publication time | Views: 109 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement