अहिल्यानगर मधील अमृत कार्यालय येथे "उद्योजकता विकास कार्यक्रम" (EDP) प्रशिक्षणाची सुरवात नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांच्या शुभहस्ते झाली.
अहिल्यानगर : "अमृत"(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) अंतर्गत अमृत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) आज उत्साहात सुरुवात झाली. नवउद्योजक महिलांना व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी, त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत,हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक श्री मंगेश खाडिलकर यांच्या शुभहस्ते या 10 दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.
प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी प्रस्ताविक करत अमृत संस्थेच्या योजना व प्रशिक्षणाचा उद्देश या विषयी माहिती दिली.
त्यानंतर सविस्तर मार्गदर्शन करताना मंगेश खाडिलकर यांनी अमृत आरिवर्क,अमृत अन्नपूर्णा, अमृत इमिटेशन ज्वेलरी व अमृत फॅशन -ब्युटी पार्लर प्रशिक्षण,"अमृत पेठ–थेट बाजारपेठ", अमृत इ -कॉमर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म,यांची सविस्तर माहीती दिली.प्रशिक्षण मध्ये अनेक महिला लाभार्थी यांनीही सहभाग घेतला आहे.यानंतर बँक शाखा अधिकारी, सी. ए व मार्केटिंग तज्ञ् यांचे काही दिवस प्रशिक्षण मिळणार आहे.
जिल्हा उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment