विश्वबंधुत्वाचा संदेश, युवा शक्तीला प्रेरणेची दिशा

विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त अमृत जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे विशेष उपक्रम :

यवतमाळ : विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त अमृत जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

विश्वबंधुत्वाचा संदेश, युवा शक्तीला प्रेरणेची दिशा मुख्य फोटो
विश्वबंधुत्वाचा संदेश, युवा शक्तीला प्रेरणेची दिशा अतिरिक्त फोटो

विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त अमृत जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे विशेष उपक्रम :

यवतमाळ : विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त अमृत जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

उपस्थित युवा वर्गाला स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांची माहिती देत आत्मविश्वास, ध्येयवेड, राष्ट्रप्रेम, मानवसेवा आणि बंधुभाव यांची प्रेरणा देण्यात आली. युवकांनी आपल्या सामर्थ्याचा सकारात्मक उपयोग करून समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

स्वामी विवेकानंद यांचा विश्वबंधुत्व, समानता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश आजच्या युवा पिढीसाठीही तितकाच प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली.

या उपक्रमास अमृत जिल्हा कार्यालयातील पदाधिकारी, कर्मचारी तसेच युवा वर्ग उपस्थित होता.

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 12-09-2026 News publication date | Time: 05:40 PM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement