पालघर जिल्ह्यात जे. एम. ठाकूर हायस्कूल, वाणगाव येथे 'अमृत वर्ग' उपक्रम उत्साहात संपन्न

वाणगाव , स्थानीय जे. एम. ठाकूर हायस्कूल येथे शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी 'अमृत वर्ग' या नाविन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रमाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि गुणवत्ता वाढवणे हा या विशेष वर्गांचा मुख्य उद्देश आहे.
उद्देश
पुढील पिढीत नेतृत्वगुणांची जडणघडण, राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्राबद्दल आत्मीयता व जबाबदारीची जाणीव निर्माण करणे.

वैशिष्ट्ये
शिस्तबद्ध रचना, सर्वांगीण विकास, संस्कार, नेतृत्व, सहभागातून शिक्षण.

पुढील संधी
विद्यार्थी स्वतः नेतृत्व करतात, नवीन वर्ग सुरू करतात, समाजात सकारात्मक परिवर्तन घडवतात.

पालघर जिल्ह्यात जे. एम. ठाकूर हायस्कूल, वाणगाव  येथे 'अमृत वर्ग' उपक्रम उत्साहात  संपन्न मुख्य फोटो
पालघर जिल्ह्यात जे. एम. ठाकूर हायस्कूल, वाणगाव  येथे 'अमृत वर्ग' उपक्रम उत्साहात  संपन्न अतिरिक्त फोटो

अमृत वर्ग' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे.उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्याध्यापकांनी सांगितले की, "बदलत्या काळासोबत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.

'अमृत वर्ग' हा उपक्रम आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करेल."या सोहळ्याला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे .शिक्षकांनी मार्गदर्शनात सांगितले की, या अमृत वर्गामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली आहे. शाळेतील एकूण 150 विद्यार्थ्यांना प्रशिक्षक श्री . कैलास कुरकुटे ह्यांचे अमृत वर्ग घेतले.

अमृत संस्थे तर्फे उपक्रमात अमृत सखी सौ कोमल जोशी व श्री अमित उदय आठवले उपस्थित होते.

सौ सुप्रिया शेखर साळवी ( मुख्याध्यापिका) श्री अजय बंजारा ( शिक्षक समन्वयक) सौ ललिता नामुगडे सौ शुभांगी पाध्ये सौ आदिती राऊत श्री रुपेश वझे सौ बिना संखे हे आदि शिक्षक अमृत वर्गास उपस्थित होते . अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार ,हिंदू वीरर्शैव लिंगायत ,अग्रवाल अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. अधिक माहिती साठी संपर्क : श्री . अमित उदय आठवले जिल्हा पालघर .९११२२२६५३०/९९७५११७८०७

Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news
Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 34 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement