"अमृत"(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) अंतर्गत अमृत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) दि १२ सेप्टेंबर पासून उत्साहात सुरुवात

"अमृत"(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) अंतर्गत अमृत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) दि १२ सेप्टेंबर पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. नवउद्योजक महिलांना व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी, त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
शिवाजी युनिव्हर्सिटी येथील राज्यपाल नियुक्त सिनेट श्री दीक्षित सर यांच्या शुभहस्ते या 10 दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले.

"अमृत"(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) अंतर्गत अमृत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) दि १२ सेप्टेंबर पासून उत्साहात सुरुवात मुख्य फोटो
"अमृत"(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) अंतर्गत अमृत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) दि १२ सेप्टेंबर पासून उत्साहात सुरुवात अतिरिक्त फोटो

कोल्हापूर : "अमृत"(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) अंतर्गत अमृत कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाला (EDP) दि १२ सेप्टेंबर पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. नवउद्योजक महिलांना व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी, त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

शिवाजी युनिव्हर्सिटी येथील राज्यपाल नियुक्त सिनेट श्री दीक्षित सर यांच्या शुभहस्ते या 10 दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले. राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.


प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी प्रस्ताविक करत अमृत संस्थेच्या योजना व प्रशिक्षणाचा उद्देश या विषयी माहिती दिली.

त्यानंतर सविस्तर मार्गदर्शन करताना श्री दीक्षित सर यांनी अमृत या संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ईडीपी प्रशिक्षणासंदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना देऊन हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून या प्रशिक्षणाच्या निमित्ताने नवउद्योजक व उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांनी या ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हावे व आपले कौशल्य वाढवून एक सक्षम उद्योजक व अनुभवी उद्योजक बनावे तसेच अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज नव उद्योजकांना असल्याचे मत दीक्षित सरांनी व्यक्त केले व त्यांच्या उद्योगवाढीस देखील मदत होऊ शकते अशा प्रकारचे श्री दीक्षित सर यांनी आपल्या मनोगतातून अमृत या संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल आपले मत व्यक्त केले.

या प्रशिक्षणासाठी एम सी डी चे पूर्व आधिकारी व यशधा चे ट्रेनर श्री सुरेश उमाप सर हे अनुभवी प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. त्यांचा स्पेशल विषय हा ई डी पी असून या विषयाचा त्यांना 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अशा अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून अमृत एडीपी प्रशिक्षणाला कोल्हापूरमधून उत्साहात सुरवात व सदर प्रशिक्षणासाठी महिला व पुरुष नव उद्योजकांच्या कडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण येणाऱ्या काळामध्ये देखील जिल्हा कार्यालयामध्ये आयोजित करून नवउद्योजक घडवण्यात आपण नेहमी सदैव आमच्या पाठीशी रहावे अशा प्रकारचे मनोगत प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थांच्याकडून व्यक्त करण्यात आले.

अमृत पेठ–थेट बाजारपेठ", अमृत इ -कॉमर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म, यांची सविस्तर माहीती दिली. प्रशिक्षण मध्ये अनेक महिला लाभार्थी यांनीही सहभाग घेतला आहे. यानंतर बँक शाखा अधिकारी, सी. ए व मार्केटिंग तज्ञ् यांचे काही दिवस प्रशिक्षण मिळणार आहे.

जिल्हा उपव्यवस्थापक अभिजीत कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228764 जिल्हा कार्यालय पत्ता : जिल्हा कार्यालय पत्ता : सी एस न २५०/ बी १ केव्हिज पार्क हॉटेल पाटील वाडा समोर, नगाळा पार्क कोल्हापूर. पिन कोड न . – ४१६ ००३

Publisher: प्रशांत अरुण जोशी News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 02:28 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: प्रशांत अरुण जोशी News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 02:28 PM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement