अमृतपेठ थेट बाजारपेठेला लातूरचे व्यावसायिक श्री. मनोज जोशी यांची भेट; उद्योजकांशी साधला संवाद

स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमृतपेठ थेट बाजारपेठेला लातूरचे व्यावसायिक श्री. मनोज जोशी यांची भेट; उद्योजकांशी साधला संवाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

*लातूर, दि. १५ सप्टेंबर :* स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

*लातूरचे व्यावसायिक श्री. मनोज जोशी* यांनी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठेला’ भेट देऊन सहभागी उद्योजक व विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध स्टॉलला भेट देत स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्या व्यवसायातील संधी, अडचणी आणि बाजारपेठेतील गरजा याबाबत चर्चा केली.

*दि. १२ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर* येथे या बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक व स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देतानाच उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे थेट प्रदर्शन व विक्री करण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली.

अमृतच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उद्योजकांना विविध योजना, प्रशिक्षण व व्यवसायविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ हा उपक्रम स्थानिक उद्योजकांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे.*

यावेळी *अमृतचे विभाग व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी, अमृत मित्र अमित पांडे, अमृत मित्र प्रशांत कापसे, माजलगावचे सुमित धिरडे तसेच राजन भैय्या कुलकर्णी* उपस्थित होते.


अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर

संपर्क क्रमांक- 7391065470


पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 04:03 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 04:03 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement