स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
*लातूर, दि. १५ सप्टेंबर :* स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाला *लक्ष्मी अर्बन बँकेचे शाखाधिकारी श्री. सिद्धेश्वर पवार* यांनी भेट देऊन सहभागी उद्योजक व विक्रेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध स्टॉलला भेट देत उद्योजकांच्या व्यवसायाची व उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच व्यवसायवाढीसाठी आवश्यक असलेल्या *कर्ज सुविधा, कर्ज घेण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि बँकेच्या विविध कर्ज योजनांबाबत* उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.
व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने अर्थसहाय्य उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळालेले मार्गदर्शन उद्योजकांसाठी उपयुक्त ठरले. यामुळे उद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक पर्यायांची माहिती मिळण्यास मदत झाली.
*दि. १२ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर* येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’चे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक व स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देतानाच उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली.
अमृतच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उद्योजकांना विविध योजना, प्रशिक्षण, कर्ज व व्यवसायविकासाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जात आहे. *अमृतपेठ हा उपक्रम केवळ विक्रीचे व्यासपीठ न राहता उद्योजकांना बाजारपेठ, अर्थसहाय्य आणि व्यवसायवाढीच्या संधींशी जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.*
यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी, अमृत मित्र अमित पांडे, अमृत मित्र प्रशांत कापसे, माजलगावचे सुमित धिरडे तसेच राजन भैय्या कुलकर्णी* उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment