अमृत कार्यालयात भक्तिमय वातावरण ग्राहक पंचायत महाराष्ट्र टीमच्या हस्ते गणरायाची आरती;

छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयात गणरायाची आरती उत्साहात पार पडली. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या मान्यवरांच्या हस्ते झालेल्या आरतीनंतर अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घेण्यात आली.

अमृत कार्यालयात भक्तिमय वातावरण ग्राहक पंचायत महाराष्ट्र टीमच्या हस्ते गणरायाची आरती; मुख्य फोटो
अमृत कार्यालयात भक्तिमय वातावरण ग्राहक पंचायत महाराष्ट्र टीमच्या हस्ते गणरायाची आरती; अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त आज मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) सकाळी श्री गणपती बाप्पाची आरती भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली.

ग्राहक पंचायत छत्रपती संभाजीनगर उपाध्यक्ष, महावितरणचे सेवानिवृत्त महाभियंता तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मार्गदर्शक दीपक केशवराव कुलकर्णी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी हेमंत मधुकर मराठे तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जालना जिल्हा पालक डॉ. दिलीप वसंतराव लाड यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.

यावेळी अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, मराठवाडा विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृत सखी मंजू कुलकर्णी आणि अमृत सखी रूचा शर्मा उपस्थित होती.

आरतीनंतर ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या टीमने अमृतच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि लक्षित गटासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. अमृतच्या माध्यमातून युवक, युवती, महिला आणि गरजू घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा टीम तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 154 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 154 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement