जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचाते यांच्याशी अमृत संस्थेच्या योजनांबद्दल चर्चा
अमरावती : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी अमरावती येथील उद्योग भवन कार्यालयाला भेट दिली. या वेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचाते यांच्याशी अमृत संस्थेच्या विविध योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अमृत संस्थेच्या योजनांची उद्दिष्टे, लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय झाला. अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित गटासाठी अमृत संस्था करत असलेल्या कार्याची व अमृत दुर्गोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची प्रशंसा करून श्री. चेचाते यांनी संस्थेच्या पुढील कार्यात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे अमृत संस्था आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
अमृत संस्थेने तयार केलेली वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका केदार गोगरकर यांनी प्रदीप चेचाते यांना या वेळी भेट म्हणून दिली.
पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,
आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,
टोपेनगर, अमरावती
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment