धाराशिव येथील अमृत पेठमध्ये १२ वर्षीय स्वराज आचार्यचा प्रेरणादायी सहभाग

अमृत पेठमध्ये १२ वर्षीय स्वराज गोपाळ आचार्य याचा प्रेरणादायी सहभाग
धाराशिव येथील अमृत पेठमध्ये १२ वर्षीय स्वराज गोपाळ आचार्य याने उत्स्फूर्त सहभाग घेत फुलांचा स्टॉल उभारला. स्वतः फुलांची मांडणी करून ग्राहकांशी संवाद साधत त्याने विक्रीचा अनुभव घेतला.

धाराशिव येथील अमृत पेठमध्ये १२ वर्षीय स्वराज  आचार्यचा प्रेरणादायी सहभाग मुख्य फोटो
मुख्य फोटो

धाराशिव : अमृत स्वायत्त संस्था, महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकारातून आयोजित ‘अमृत पेठ’ या थेट बाजारपेठ उपक्रमात लहान वयात व्यवसायाची आवड जोपासणाऱ्या १२ वर्षीय स्वराज गोपाळ आचार्य याने फुलांचा स्टॉल लावून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अमृत पेठमध्ये विविध वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये स्वराजने स्वतः पुढाकार घेत आकर्षक पद्धतीने फुलांचा स्टॉल उभारला. ग्राहकांशी संवाद साधणे, फुलांची मांडणी करणे आणि विक्री करणे यामध्ये त्याने उत्साहाने सहभाग घेतला.

लहान वयातच व्यवसाय, मेहनत आणि ग्राहकांशी संवाद यांचा अनुभव मिळावा, या दृष्टीने स्वराजचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. त्याच्या या प्रयत्नाचे अमृत पेठमध्ये उपस्थित नागरिक व आयोजकांकडून कौतुक करण्यात आले.

लहान वयातच व्यवसायाची ओळख करून देणारा आणि स्वावलंबनाची भावना रुजविणारा स्वराजचा हा प्रयत्न अमृत पेठच्या उद्देशाला अधोरेखित करणारा ठरला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Ajay Kulkarni News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 11:31 AM News publication time | Views: 478 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Ajay Kulkarni News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 11:31 AM News publication time | Views: 478 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement