बीड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच संजय नरवडे हे होते. यावेळी ग्रामसेवक मोरे साहेब, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. १७ सप्टेंबर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच संजय नरवडे हे होते. यावेळी ग्रामसेवक मोरे साहेब, शाळेतील शिक्षकवृंद, अमृतचे समन्व्ययक सुमित धिरडे, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन करण्यात आली. त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांद्वारे व शिस्तबद्ध सहभागातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि राष्ट्रप्रेमाची भावना याविषयी मार्गदर्शन केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. सरपंच संजय नरवडे, ग्रामसेवक मोरे साहेब, शिक्षकवृंद, अमृतचे समन्व्ययक सुमित धिरडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment