नामपूर (सटाणा )विश्वबंधुत्वाच्या प्रेरणेतून तरुणाई मध्ये राष्ट्रप्रेमाची जागृती -मा विजय येवले सर
नामपूर (सटाणा )विश्वबंधुत्वाच्या प्रेरनेतून तरुणाई मधे राष्ट्रप्रेमाची जागृती - मा विजय येवले सर समाजश्री प्रशांत हिरे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज नामपूर येथे विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त आयोजन करण्यात आले नामपूर (सटाणा ): महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी – AMRUT) यांच्या वतीने आयोजित ‘अमृत– विश्वबंधुत्व पंधरवडा’ अभियानांतर्गत हा कार्यक्रम समाजश्री प्रशांत हिरे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज नामपूर येथे आयोजन करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मृतीनिमित्त सन 2026 पासून ‘अमृत विश्वबंधुत्व दिवस’ हा विशेष उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’ या उदात्त विचाराला केंद्रस्थानी ठेवून समाजात विश्वबंधुत्व, मानवता, सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि सौहार्दाची भावना दृढ करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या वक्ते श्री विजय येवले सर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे विचार, त्यांचा वैश्विक बंधुभावाचा संदेश तसेच सामाजिक एकात्मतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध समाज घटकांमध्ये परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन सरांनी केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम्’, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी युवकांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या सीमा ओलांडून एकमेकांशी प्रेम, आपुलकी आणि सहकार्याची भावना ठेवावी. विश्वबंधुत्व, सामाजिक एकता आणि मानवतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अमृत’ संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला अमृत चे DEO संजय गोसावी व समाजश्री प्रशांत हिरे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज मधील विद्यार्थी व मा प्राचार्य श्री यु बी कदम सर उपप्राचार्य श्री एम व्ही दासनूर सर व प्रा आनंद जोशी सर शिक्षक ठाकूर सर, उपस्थित होते श्री अमित सोनवणे सर यांनी सूत्र संचलन केले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment