डॉ. महेश मोहरीर बालरोगतज्ज्ञ, MIT हॉस्पिटल व रुग्ण मदत कक्ष सदस्य यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणपती बाप्पाची आरती करण्यात आली

अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात डॉ. महेश सूर्यकांतराव मोहरीर यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.अमृतच्या सुरुवातीच्या प्रचार-प्रसाराच्या काळात डॉ. मोहरीर यांनी लक्षित गटातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून जनजागृती केली होती. सध्या ते मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी काम करत आहेत.

डॉ. महेश मोहरीर बालरोगतज्ज्ञ, MIT हॉस्पिटल व रुग्ण मदत कक्ष सदस्य यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणपती बाप्पाची आरती करण्यात आली मुख्य फोटो
डॉ. महेश मोहरीर बालरोगतज्ज्ञ, MIT हॉस्पिटल व रुग्ण मदत कक्ष सदस्य यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणपती बाप्पाची आरती करण्यात आली अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) विभागीय व जिल्हा कार्यालयात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. यानिमित्ताने १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी डॉ. महेश सूर्यकांतराव मोहरीर, बालरोगतज्ज्ञ, MIT हॉस्पिटल व रुग्ण मदत कक्ष सदस्य यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी अमृतचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी डॉ. महेश मोहरीर यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे उपस्थित होते.

अमृतच्या योजना आणि EWS संदर्भात सुरुवातीपासूनच डॉ. महेश मोहरीर यांनी चांगला पुढाकार घेतला आहे. अमृतच्या योजनांचा प्रचार-प्रसार सुरू असताना त्यांनी लक्षित गटातील समाजापर्यंत अमृतच्या योजना आणि EWS बाबत माहिती पोहोचवून जनजागृती करण्याचे काम केले.

गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर डॉ. महेश मोहरीर यांच्यासोबत अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि लक्षित गटातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याबाबत चर्चा झाली. सध्या डॉ. मोहरीर हे मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामातूनही गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी काम करत आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 20-09-2026 News publication date | Time: 10:13 AM News publication time | Views: 14 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 20-09-2026 News publication date | Time: 10:13 AM News publication time | Views: 14 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement