अमृत संवाद मेळाव्याचे आयोजन; अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने ‘सेवा संकल्प अभियान’ला बळ*

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या वतीने *‘अमृत संवाद मेळावा – सेवा संकल्प अभियान २०२६’* या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या प्रदेश उपाध्यक्ष *मा. डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर* यांच्या सहकार्याने हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

अमृत संवाद मेळाव्याचे आयोजन; अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने ‘सेवा संकल्प अभियान’ला बळ* मुख्य फोटो
अमृत संवाद मेळाव्याचे आयोजन; अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने ‘सेवा संकल्प अभियान’ला बळ* अतिरिक्त फोटो

*लातूर :* महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या वतीने *‘अमृत संवाद मेळावा – सेवा संकल्प अभियान २०२६’* या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या प्रदेश उपाध्यक्ष *मा. डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर* यांच्या सहकार्याने हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण, शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी पोहोचविणे, तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.

मेळाव्यात *अमृतच्या विविध योजना व उपक्रम, पात्रता निकष, प्रशिक्षणाच्या संधी, उद्योजकता विकास, कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी* याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे व पात्रतेबाबत थेट मार्गदर्शन मिळणार असल्याने हा उपक्रम लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

या उपक्रमाला *अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजय जोशी* यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने आयोजित होणाऱ्या या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून अमृतच्या योजना व विविध संधी अधिक व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

*‘सेवा संकल्प अभियान – २०२६’*च्या माध्यमातून शासनाच्या योजना समाजातील पात्र व गरजू घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प अधिक दृढ केला जाणार आहे. नागरिकांनी या संवाद मेळाव्यात सहभागी होऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 20-09-2026 News publication date | Time: 07:17 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 20-09-2026 News publication date | Time: 07:17 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement