अक्कलकुवा येथील दुर्गमभागातील विद्यार्थ्यांना मिळाले शासकीय कार्यालयाची माहिती

अमृत शासन संवाद सेतू उपक्रमातून विद्यार्थ्यानी जाणून घेतले तहसीलदार कार्यालयातील कामकाज

अक्कलकुवा येथील दुर्गमभागातील विद्यार्थ्यांना मिळाले शासकीय कार्यालयाची माहिती मुख्य फोटो
अक्कलकुवा येथील दुर्गमभागातील विद्यार्थ्यांना मिळाले शासकीय कार्यालयाची माहिती अतिरिक्त फोटो

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा येथे तहसील कार्यलयात अमृत सवांद सेतू उपक्रम घेण्यात आला विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचा संवाद घडवीणारा अभिनव उपक्रम महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत )च्या वतीने विद्यार्थांना प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्येक्ष समजावी नागरिकांमध्ये सुजाण नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी आणि विद्यार्थी व प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते दृढ व्हाव म्हणून अमृत तर्फे अमृत शासन संवाद सेतू कार्यक्रम अक्कलकुवा येथील तहसीलदार तथा दंडा अधिकारी कार्यालयात घेण्यात आले.

तहसीलदार विनायक घुमरे साहेब यांनी तहसील कार्यालयातील सर्व विभागा बद्दल सविस्तर माहिती दिली त्यात पुरवठा विभाग,महसूल विभाग,मतदान विभाग,कोषागार विभाग,नोंदणी व मुद्रांक विभाग असे सर्वच विभागातील विभाग अधिकाऱ्यांनी विद्यार्थांनां मार्गदर्शन केले कागदपत्रे कशे तयार करायचे कोणते कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे कोणते विभागात गेले पाहिजे.

वयाची अट काय असते विविध योजनाचे लाभ कशे मिळतात कोणाला मिळतात आदी.. तहसीलदार विनायक घुमरे साहेब यांनी स्वतः बद्दल माहिती देत भावुक झाले त्यांनी स्वतः कशी महिनत चिकाटीने भरपूर परिश्रम घेतल एक साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगा इत पर्यंत येऊ शकतो तर तुम्ही का काही तुम्ही चांगलं अभ्यास करा महिनत करा.. रिकाम्या भानगडीत न पडता आपल्या देशाचा विकासात आपला मोलाचा वाटा द्या.

अशी महत्वपूर्ण माहिती आज विद्यार्थ्यांना मिळाली तहसीलदार साहेबांनी त्यांचा दालनात 30 -35 विद्यार्थ्यांचे गट बोलावून विद्यार्थी, विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली या उपक्रमाणे विध्यार्थ्यांचं आत्मविश्वास वाढला अचूक माहिती झाली भविष्यात ते त्यांचा कामास नक्की येईल अशी आशा सोबत आलेले सावित्रीबाई फुले विद्यालयचे प्राध्यापकांनी केली.... या वेळी सावित्रीबाई फुले विद्यालय व विद्या विकास महाविद्यालयाचे १२० ते १५० विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे आणि आभार प्राध्यापक गणेश चौधरी सर यांनी केलं..


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 20-09-2026 News publication date | Time: 10:38 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 20-09-2026 News publication date | Time: 10:38 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: Nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement