गणपती बाप्पाच्या आरतीला विजया सचिन अवस्थी तसेच उत्तरदेशीय महिला सेवा समितीची उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर येथील अमृत विभागीय व जिल्हा कार्यालयात गणपती बाप्पाच्या आरतीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी विजया सचिन अवस्थी तसेच उत्तरदेशीय ब्राह्मण महिला सेवा समितीच्या वतीने आरती करण्यात आली. जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी विजया अवस्थी यांचे स्वागत केले.

गणपती बाप्पाच्या आरतीला विजया सचिन अवस्थी तसेच उत्तरदेशीय महिला सेवा समितीची उपस्थिती मुख्य फोटो
गणपती बाप्पाच्या आरतीला विजया सचिन अवस्थी तसेच उत्तरदेशीय महिला सेवा समितीची उपस्थिती अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर येथील अमृत विभागीय व जिल्हा कार्यालयात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यानिमित्ताने २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विजया सचिन अवस्थी तसेच उत्तरदेशीय ब्राह्मण महिला सेवा समितीच्या वतीने गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.

यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी विजया अवस्थी यांचे स्वागत केलं.यावेळी उषा मिश्रा, पार्थ औरादकर, धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 21-09-2026 News publication date | Time: 03:47 PM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 21-09-2026 News publication date | Time: 03:47 PM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement