पडसगाव व गडचिरोली येथे ‘एक दिवस राष्ट्रासाठी – जेन-जी’ उपक्रम; युवकांना व्यसनमुक्ती, संस्कार व राष्ट्रसेवेची दिशा

अमृत तर्फे 'gen - z' युवक विद्यार्थ्यांना मौलाचे मार्गदर्शन

पडसगाव व गडचिरोली येथे ‘एक दिवस राष्ट्रासाठी – जेन-जी’ उपक्रम; युवकांना व्यसनमुक्ती, संस्कार व राष्ट्रसेवेची दिशा मुख्य फोटो
पडसगाव व गडचिरोली येथे ‘एक दिवस राष्ट्रासाठी – जेन-जी’ उपक्रम; युवकांना व्यसनमुक्ती, संस्कार व राष्ट्रसेवेची दिशा अतिरिक्त फोटो

पडसगाव व गडचिरोली येथे ‘एक दिवस राष्ट्रासाठी – जेन-जी’ उपक्रम; युवकांना व्यसनमुक्ती, संस्कार व राष्ट्रसेवेची दिशा

गडचिरोली, दि. २१ सप्टेंबर २०२६ : अमृत संस्थेच्या वतीने ‘एक दिवस राष्ट्रासाठी – जेन-जी’ या उपक्रमांतर्गत आरमोरी तालुक्यातील पडसगाव येथील उच्च माध्यमिक सरस्वती महाविद्यालय तसेच गडचिरोली येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे युवकांसाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पडसगाव येथील कार्यक्रमास एकूण १३० विद्यार्थी, त्यामध्ये ७५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यावेळी चंद्रपूर विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र, विचार, युवकांसमोरील आवाहन, आत्मविश्वास, ध्येय निश्चिती, चारित्र्यनिर्माण आणि राष्ट्रसेवा याबाबत मार्गदर्शन केले. युवकांनी सकारात्मक विचार, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा अंगीकारून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, तसेच देव, देश आणि धर्मासाठी आपल्या सामर्थ्यानुसार योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, गडचिरोली येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ‘व्यसनमुक्त युवा’ या विषयावर दोन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात सीनियर महाविद्यालयातील १७८ विद्यार्थी, तर दुसऱ्या सत्रात ज्युनिअर महाविद्यालयातील २१० विद्यार्थी, असे एकूण ३८८ विद्यार्थी सहभागी झाले.

गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्स व अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच युवकांची समाजातील सकारात्मक भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक, गडचिरोली श्री. विक्रम पांडे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, योग्य नियोजन आणि उपलब्ध शासकीय योजनांची माहिती दिली.

सीनियर सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उईके सर, तर ज्युनिअर सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कुत्तरमारे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोलीच्या DEO माधुरीताई रोटकर यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वेदांत मेहता यांनी नियोजन व अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेतला.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, त्यांच्यात सकारात्मक विचार व संस्कार रुजविणे, करिअरच्या योग्य दिशा उपलब्ध करून देणे आणि युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्याशी जोडणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: वेदांत सुनील मेहता News publisher name | Date: 21-09-2026 News publication date | Time: 05:32 PM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news
Publisher: वेदांत सुनील मेहता News publisher name | Date: 21-09-2026 News publication date | Time: 05:32 PM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement