साकोली तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ व MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि तहसील कार्यालय, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, साकोली येथे ‘अमृत संवाद सेतू’ सामाजिक उपक्रम आणि MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात साकोली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रणया भालेकर व तहसीलदार श्री. निलेश कदम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्य, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, वर्तमानपत्र वाचन आणि मानसिक आरोग्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

साकोली तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ व MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न. मुख्य फोटो
साकोली तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ व MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न. अतिरिक्त फोटो

साकोली, दि. २१ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि तहसील कार्यालय, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, साकोली येथे ‘अमृत संवाद सेतू’ सामाजिक उपक्रम आणि MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात साकोली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रणया भालेकर आणि मा. तहसीलदार श्री. निलेश कदम यांनी विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी सुरू करावी, अभ्यासाचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, अभ्यासात सातत्य व प्रेरणा कशी टिकवून ठेवावी, तसेच स्पर्धा परीक्षांमधून उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. परीक्षेच्या तयारीची रणनीती तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेशी संबंधित प्रश्नांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रणया भालेकर यांनी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार तयारी करावी, अभ्यासात सातत्य ठेवावे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा आणि नियमित वर्तमानपत्र वाचावे, असा सल्ला दिला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मानसिक आरोग्य जपणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर मा. नायब तहसीलदार श्री. भुमेश्वर पेंडाम यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांची माहिती करून दिली. तहसील कार्यालयातील विविध विभाग कोणते काम करतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थी दशेत उपयुक्त असलेल्या विविध दाखल्यांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, याची कार्यपद्धतीही समजावून सांगण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. संबंधित विभागप्रमुखांशी संवाद साधून विद्यार्थ्यांनी त्या विभागातील कामकाजाची माहिती घेतली. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची आणि विविध विभागांची कार्यपद्धती समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

‘अमृत संवाद सेतू’ हा विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेची प्रत्यक्ष ओळख करून देणारा सामाजिक उपक्रम आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती, विविध शासकीय विभागांचे कामकाज आणि नागरिकांशी संबंधित सेवांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळते. त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळाले.

या उपक्रमास मा. उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रणया भालेकर आणि साकोली तालुक्याचे मा. तहसीलदार श्री. निलेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील कामकाजाची माहिती मिळावी यासाठी आवश्यक सहकार्य केले. याबद्दल जिल्हा व्यवस्थापक श्री. ओमकार हरदास यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय, तळ मजला, श्री साई किराना घर, स्टेशन रोड, शास्त्री चौक, भंडारा येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : ९११२२२८७७५, ८८५७९३४७३२

Publisher: sakshi joshi News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 11:23 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: sakshi joshi News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 11:23 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement