सोलापुरात ‘अमृत’च्या माध्यमातून नव्या व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षणाच्या संधींना चालना
सोलापूर, दि. १९ सप्टेंबर २०२६ : *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)*च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील युवकांसाठी व्यवसाय, कौशल्यविकास आणि तांत्रिक प्रशिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
अमृतचे माननीय व्यवस्थापकीय संचालक सर सोलापूर दौऱ्यावर आले असता, इन्क्युबेशन सेंटरचे अधिकारी श्री. गुराणी सर व त्यांचे सर्व सहकारी यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अमृत आणि इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून एकत्रितपणे विविध उपक्रम राबवून युवकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीत अमृतच्या माध्यमातून सोलापूरमध्ये कोणत्या प्रकारची मदत करता येईल, तसेच युवकांना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या दृष्टीने कोणत्या नव्या संधी उपलब्ध करून देता येतील, यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून सोलापूरमध्ये विविध तांत्रिक व कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करता येतील का, याबाबतही चर्चा करण्यात आली. स्थानिक गरजा, उद्योग क्षेत्रातील संधी आणि युवकांच्या कौशल्यविकासाचा विचार करून तांत्रिक अभ्यासक्रम राबविण्याच्या शक्यतांचा आढावा घेण्यात आला.
या भेटीदरम्यान “आपण एकत्र येऊन अमृतचे सोलापूरमध्ये उत्तम काम करूया”, असा सकारात्मक आशावाद व्यक्त करण्यात आला. आगामी काळात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), विद्यापीठ आणि इन्क्युबेशन सेंटर यांच्या समन्वयातून सोलापूरमधील युवकांसाठी व्यवसाय, कौशल्यविकास आणि तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment