सोलापूरच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘अमृत’ आणि उद्योगवर्धिनीचा पुढाकार

सोलापूरच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘अमृत’ आणि उद्योगवर्धिनीचा पुढाकार

सोलापूरच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘अमृत’ आणि उद्योगवर्धिनीचा पुढाकार मुख्य फोटो
सोलापूरच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘अमृत’ आणि उद्योगवर्धिनीचा पुढाकार अतिरिक्त फोटो

सोलापूर, दि. १९ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ‘अमृत’, सोलापूर येथे महिलांच्या आर्थिक व व्यावसायिक सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

यावेळी उद्योगवर्धिनीच्या संस्थापक चंद्रिका चव्हाण यांनी अमृत संस्थेला भेट देऊन महिलांसाठी राबविता येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली. महिलांसाठी कोणते व्यवसाय सुरू करता येतील, त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देता येईल तसेच अमृतच्या माध्यमातून महिलांना कोणत्या योजनांचा लाभ मिळवून देता येईल, याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

तसेच अमृत वर्ग कशा पद्धतीने आयोजित करता येतील आणि त्यामधून महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन कसे देता येईल, याबाबतही सविस्तर चर्चा झाली.

अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जाणून घेत चंद्रिका चव्हाण यांनी अमृत संस्थेसोबत कायम जोडलेले राहून महिलांच्या विकासासाठी काम करण्याची तयारी दर्शविली.

अमृतच्या योजनांचे त्यांनी कौतुक केले असून, भविष्यात महिलांसाठी विविध प्रशिक्षण, व्यवसायविकास व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे सोलापूरच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अमृत आणि उद्योगवर्धिनी यांच्या सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Birudev Waghmode News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 12:52 PM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: Birudev Waghmode News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 12:52 PM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement